राहुरी : जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच जोराचे वारे व विजाच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३१ मे रोजी जिल्ह्याच्या दक्षिण भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान अंदाजाआधारीत कृषि सल्ला
पावसाची शक्यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने, फळ पिकाचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काठयाचा आधार देऊन प्लॅस्टिक दोरीच्या सहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत.
जनावराना उघड्यावर चरावयास पाठवु नये, तसेच त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे तसेच झाडाखाली बांधू नयेत.
जनावरे गोठ्यात बांधावीत आणि चारा उपलब्ध करुन द्यावा. शेडमध्ये पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. जर पाणी साठलेल्या कोरड्या चाऱ्यावर पडले आणि बुरशीचे आक्रमण आढळले तर तो चारा जनावरांना देवु नये. पावसाच्या शक्यतेमुळे, विद्युत उपकरणाचा संपर्क टाळा. शेतातील कामे शक्यतो टाळावीत.
हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता "मेघदुत" मोबाईल अँपचा वापर करावा, वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता "दामिनी" मोबाईल अँपचा वापर करावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment