स्टील चोरून नेणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश...


कोपरगाव : शहरासह परिसरातील सुरु असलेल्या बांधकामावरून स्टील चोरून नेण्याच्या घटना घडत होत्या. या प्रकरणी एकूण सात जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

कोपरगाव शहर व परिसरात अनेक बांधकामे सुरु आहे. लॉकडाउनमुळे सध्या कामे बंद आहेत. या कामावरून सध्या स्टील चोरून नेण्याच्या घटना घडत आहे. या प्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झालेले आहेत.

या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु होता. याच दरम्यान टग्या उर्फ राजेंद्र शिंदे याने हे स्टील चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली. 

या प्रकरणी एकूण सात जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे.

स्टील चोरणारीटोळी पोलिसांनी पाडल्यामुळे बांधकामे सुरु असणार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोलिसांच्या कामगिरी बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post