डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी... पोलिस प्रशासनाला निवेदन...


नगर : नगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटल येथील आरोग्य अधिकारी राहुल ठोकळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी सिटी स्क्वेअर हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आली आहे. 

याप्रकरणी संचालक डॉ. संदीप सुराणा यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी उपस्थित होते. 

डॉ. संदीप सुराणा म्हणाले की, रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात डॉक्टर ठोकळ यांचा हात फॅक्चर झाले आहे. त्यांना 30 टाके पडले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post