नगर : कोरोना लसीकरणाचा सुरु झालेला घोळ काही केल्या मिटाया तयार नाही. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी त्यावर ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावर लागलेल्या रांगा कायम आहेत.
कोरोना लसीकरणात ज्याचा वशिला त्याचेच नाव लसीला असे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. या संदेशातून लसीकरणात कसा गोंधळ चालतोय हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य नागरिकांनी सुरु केलेला आहे.
लसीकरणात होत असलेल्या गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनात सर्वसामान्यांनी आणून देऊनही त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अनेकांना सकाळी लसीसाठी सकाळपासून थांबूनही लस मिळत नाही. विशेष म्हणजे ज्यांचा वशिला आहे. त्यांना तात्काळ लस उपलब्ध होत आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post a Comment