नगर : शहरातील एका व्याप्रायाला लुटणार्या आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
नहूश सुनिल पडतुरे (वय ३१, धंदा : मोबाईल शॉपी , रा./गायकवाड मळा, चिंतामणी हॉस्पिटलमागे, सावेडी, अहमदनगर हे गुरुदत्त लॉन, पंपीग स्टेशन रस्ता सावेडी) हे त्यांचे मित्रासमवेत गणा मारत बसलेले होते.
त्याच वेळी कोणीतरी अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना फोन करुन तुमचे फ्लॅटचे थकलेले भाडे देतो असे म्हणून फिर्यादी यांना सावेडीतील परिचय हॉटेल जवळ येथे बोलावून घेतले. तेथून पडतुरे यांना मोटार सायकलवरुन बुन्हाणनगर रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ नेवून तेथे पडतुरे यांना मारहाण करुन फिर्यादीजवळील चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, मोबाईल, खिशातील पाकीट असा 40 हजार 300 ऐवज चोरुन नेला होता.
या बाबत पडतुरे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा महेश मिसाळ (रा. माणिक चौक, नगर) याने केलेला आहे. मिसाळ हा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये फिरत आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोलिस निरीक्षक संदीप पवार, सुनिल चव्हाण , पोलिस कॉन्स्टेबल योगेश सातपुते मिसाळ याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. मिसाळ याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Post a Comment