विद्यार्थ्यांच्या चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन नको... शिक्षक भारतीचा विरोध


नगर : शिक्षण विभागाने राज्यातीलशिक्षक प्रशिक्षणासाठी नवीन धोरण आखले असून, त्यानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची योजना शिक्षण विभागाने आखली आहे. विद्यार्थ्यांच्या चाचणी गुणांवरून शिक्षक किती प्रशिक्षित आहेत, प्रशिक्षणाचा कसा उपयोग करत आहेत, यावरून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. यावरच आधारित शिक्षकांचे वेतन निश्चित करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. याला शिक्षक भारती संघटनेकडून  विरोध

होत आहे. अशी माहिती शिक्षक नेते तथा राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली सध्याचे वातावरण, विद्यार्थ्याची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता या सर्व घटकांवर शिक्षण अवलंबून असते. 

केवळ शिकविणे अपेक्षित नसून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे असते व शाळांमध्ये असे उपक्रम शिक्षक राबवितात. अशा

प्रकारांतून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी बनविणे आणि यासाठी एक सामान्य परीक्षा घेऊन शिक्षकांना वेतनवाढ देणे

किंवा न देणे अत्यंत चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. 

विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची योजना शिक्षण विभागाने आखली आहे. परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असून, त्यासाठी प्रणाली तयार करण्याच्या निविदा विभागाने मागवल्या आहेत.

शिक्षकांना दरवर्षी जे प्रशिक्षण देण्यात येते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होते का? अध्ययन सहज सुलभ

होते का? याचे मूल्यांकन करण्यासाठी ऑफलाईन, ऑनलाईन कोणतीच पद्धत उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन टीचर प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार आहे. याला शिक्षक भरतीचा विरोध असून वेतन वेळेवर न देणाऱ्या शासनाला शिक्षकांचे वेतन कमी करण्याच्या सूचनेला हा एक पर्याय असल्याचा आरोप शिक्षक भारती चे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अनुभूति देणे आवश्यक आहे. तशा सोयी शिक्षण खाते उपलब्ध करण्यासाठी काय प्रयत्न करते? तंत्रज्ञान युगात अनेक तंत्र साधनांच्या द्वारे विद्यार्थी शिकत असतो. 

या साधनांच्या सहवासातील विद्यार्थी सरस ठरतील. तेथे शिक्षकाला जबाबदार कसे धरणार? असे प्रश्न राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख. योगेश हराळे.उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत  रायकर ,सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, सोपानराव कळमकर, संजय भुसारी, शंकर भिवसने, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, महिला सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागर, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे आदींनी उपस्थित केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post