पारनेर : संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला सध्या मदतीचा ओघ सुरु आहे. जिल्ह्याबरोबरच राज्यभरातून हा मदतीचा ओघ येत आहे. आता सातासमुद्रापार असलेल्यांकडूनही या कोविड सेंटरला मदत केली जात आहे. अमेरिकेतूनही या कोविड सेंटरला मदत झालेली आहे. या मदतीमुळे येथे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत.
निघोज ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असणारे एक छोटे खेडे म्हणून सर्वांनाच या गावाविषयी आपुलकी आहे. या गावातील निघोज सोसायटीचे माजी उपाध्यक्ष पोपटराव कळमोडे यांचे दोन्ही सुपुत्र उच्चशिक्षित असून सध्या ते अमेरिकेत आहेत.
हे याची माहिती फारच थोड्या लोकांना असणार आहे. युवा शास्त्रज्ञ हनुमान कळमोडे हे पीएचडी तर ज्ञानेश्वर कळमोडे हे आयटी इंजिनिअर आहेत.
शिरसुले येथील युवक अमेरिकेत कार्यरत आहे. ही बाब निघोजकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
अमेरिकेत जरी असले तरी वडील पोपटराव कळमोडे यांचा सामाजिकतेचा वसा जपण्याचे काम त्यांनी केले आहे. पोपटराव कळमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अमेरिकेतून संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला त्यांनी आजोबा कै. भगवंता कळमोडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अकरा हजार 111 रुपयांची देणगी दिली आहे.
कळमोडे बंधूंनी आजोबा आजी आई-वडील यांच्या सामाजिक संस्काराची जाण ठेवत हजारो किलोमीटर अंतरावरील अमेरिकेतून देणगी पाठवली आहे.
Post a Comment