नगर : हातभट्टीसह विदेशीची सुमारे 36 हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत भाऊ उर्फ जय विठठल भिंगारदिवे ( वय 45 रा. घासगल्ली भिंगार ) यास अटक करण्यात आली आहे.
26 मे 2021 रोजी भाऊ उर्फ जय विठठल भिंगारदिवे (वय 45 रा. घासगल्ली भिंगार ता . नगर जि . नगर) यास अवैध गावठी हातभटटी, देशी दारु व ताडी मुद्देमाल मिळून आला.
भिंगारचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना खबर्याकडून घासगल्ली भिंगार येथे एक भाउ उर्फ जय विठठल भिंगारदिवे (वय 45 रा . घासगल्ली भिंगार ता . नगर) हा विनापरवाना बेकायदा गावठठी हातभटटी दारूची तसेच देशी दारु व ताडीची विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली.त्यानुसार येथे छापा टाकण्यात आला.
या छाप्यात 30 हजाराची किमतीची 300 लिटर गावठठी हातभटटीची दारू तसेच दोन हजार 834 रुपये किमतीची देशी दारु बॉबी संत्रा कंपनीच्या 109 बाटल्या व 3 हजार रुपये किमतीचे ताडीचे 200 फुगे प्लाँस्टीक पिशवीत असा एकूण 35 हजार 834 किंमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या छाप्यामुळे अवैध व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment