निघोज : संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटर कुठल्याही शासकीय मदतीशिवाय तसेच लोकसहभागातून आदर्शवत नियोजन सुरु असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
100 बेड क्षमता असणारे हे सुसज्ज असे हे कोविड सेंटर आहे. मुंबई येथील सर्वात मोठ्या कोविड सेंटर असलेल्या बी. के. सी. हॉस्पिटलचे डीन डॉक्टर राजेश डेरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलेले एकमेव कोविड सेंटर आहे.
शिरूर, पुणे, नगर मुंबई येथील प्रसिद्ध हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांनी भेट देऊन येथील रुण्गांची तपासणी करुन या डॉक्टरांनी कोविड सेंटरचे कौतुक केले आहे. सध्या या ठिकाणी रुग्ण पूर्ण क्षमतेने दाखल आहेत. तसेच येणाऱ्या रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवक तप्तर असतात.
या कोविड सेंटरची वैशिष्ट्य सांगताना सदस्यांनी म्हटले आहे की, सुविधा सर्व हाॅस्पिटल पेक्षा ही उत्तम, फाउंडेशनची रुग्णवाहिका रुग्णांसाठी 24 तास उपलब्ध,
24 तास निवासी डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका व स्वयंसेवक सर्वांना मोफत मेडिसीन, प्रत्येक रूमला टाॅयलेट बाथरूम ॲटेज, प्रत्येक पेशंटला टेबल स्टॅंड फॅन, प्रत्येक पेशंटला सेप्रेट वाफेचे मशीन,आंघोळीला गरम पाणी, पिण्यासाठी कोमट पाणी, दोन टाईम गरमा गरम घरगुती जेवण,नाश्ता, चहा, दोनटाईम काढा, योगा, प्राणायाम, सतसंग मनोरंजनासाठी विविध साधणे, स्वच्छता व इतर कामासाठी उत्तम प्रकारचा स्टाफ, जेवण बणवण्यासाठी सुसज्ज व उत्तम असे किचन व आचारी, प्रत्येक रुग्णालाला डिचार्ज झाल्यावर एक केशर आंब्याची हुंडी भेट, सर्वांच्या स्वागतासाठी व रुग्णाला धीर देण्यासाठी सचिन पाटलांसहीत संदीप वराळ पाटील फाऊंडेशनचे पदाधिकारी 24 तास तत्पर अशाप्रकारे या कोव्हिड सेंटरमध्ये सोयीसुविधा उपलब्ध असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी बोलताना दिली आहे.
Post a Comment