अवरफुडचे प्रक्रिया उद्योग शेतकरी प्रशिक्षण...


पाथर्डी : शेती उत्पादनावर प्रक्रिया उद्योग आधारित असलेल्या अवरफूड या कंपनीचे शेतकरी प्रशिक्षण रामचंद्र चव्हाण यांच्या माळीबाभूळगाव येथील नगररोडवरील दाळ मिल प्रक्रिया केंद्रावर पार पडले.

यावेळी कोविड  १९ च्या सर्व निकषाचे पालन करून शेतकरी उपस्थित होते. कंपनीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख रवीकुमार व अहमदनगर, नाशिक जिल्ह्याचे व्यवस्थापक अमोल शेळके तसेच जिल्ह्याचे प्रमुख अक्षय दातीर तसेच कंपनीचे सर्व पदाधिकारी उपलब्ध होते.

रवीकुमार म्हणाले की अवरफूड कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाळमिल,शेंगदाणा ऑईल मिल, हळद पावडर मिल, मिरची पावडर मिल कंपनीकडे उपलब्ध आहे. शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सर्व माहिती देण्यात येते. उद्योगासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. 

उद्योगाची उभारणी करताना कंपनीचे तज्ज्ञ आधिकारी उपस्थित राहून मशिनरी चालविण्याचे प्रशिक्षण पण दिले जाते. त्यानंतर कच्या मालापासून तयार केलेला पक्का माल पाच वर्ष अवरफूड कंपनी खरेदी करणार असल्याचा करारदेखील केला जातो. 

या प्रक्रियावर आधारित व्यवसायाची निवड केल्यास शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम होऊन आपल्या कटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे शकतो. या माध्यमातून अनेक शेतकरी उद्योजक होत आहेत. 

कंपनी प्रत्येक गावामध्ये एक केंद्र देणार आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही रविकुमार यांनी यावेळी सांगितले.

कार्यकमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अक्षय दातीर यांनी केले. अमोल चव्हाण यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post