वादातून तरुणावर हल्ला... एक ठार... चारजण जखमी....


नगर : किरकोळ कारणावरून दोन गटातवाद झाले. या वादातच तरुणावर धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना नगर तालुक्यात घडली.

शरद दत्तात्रय वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.  पिंपळगाव उज्जैनी शिवारात ससेवाडी जाणारे रस्त्यावर तलावाच्या जवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये एकजण ठार असून चारजण जखमी झालेले आहेत.

बाळासाहेब नामदेव वाघ (वय 50 रा. पिंपळगाव उज्जैनी) यांच्या फिर्यादीवरून मल्हारी उर्फ रघुनाथ बन्सी आल्हाट, सुभाष बन्सी आल्हाट, बन्सी भिवा आल्हाट, ऋषीकेश रघुनाथ आल्हाट, मारीया बन्सी आल्हाट ( सर्व रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) असे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post