कोरोनात उल्लेखनिय कामगिरी करणार्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांचे आंदोलन...


नगर : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांचे समावेश आहे. परंतु या जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांनी आज सकाळी जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन केले. यावेळी प्रशासनाने कर्मचार्यांच्या मागणीचा विचार करून तातडीने त्यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे रुग्णालयात येणा-या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. या प्रवेश बंदमध्ये जिल्हा रुग्णालयातील कक्मचार्यांचीही वाहने उडविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचार्यांना जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपली वाहने उभी करावी लागत आहे. येथून वाहने चोरीला जाण्याच्या घटना घडत आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.24) सकाळी आंदोलन केले.

आरोग्य कर्मचार्यांची वाहने गेटच्या बाहेर रस्त्यावरच लावून रुग्णालयात प्रवेश दिला जात असल्याने आमची वाहने चोरी जात आहेत. याला जबाबदार कोण ? असा सवाल करत कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलच्या गेट समोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पोलिस प्रशासनाने कर्मचार्यांशी चर्चा केली. यात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post