पारनेर : शिरुर येथील वेदांत हॉस्पिटलचे संचालक डॉ. सोमवंशी, डॉ. पालवे व परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला भेट देऊन रुण्गांची तपासणी केली.
यावेळी राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, डॉ. विक्रम वराळ, डॉ. संदेश थोरात युवानेते शशिभाऊ कारखिले, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, सुनिल पवार, गजानन ठुबे, सुनिल वराळ पाटील, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लम इनामदार, फाउंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख अविनाश बाळासाहेब वराळ पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व संदीप पाटील वराळ युवामंचचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी या कोव्हिड सेंटरला अकरा हजार रूपयांची औषध भेट दिली. तसेच युवानेते शशिभाऊ कारखिले यांनी रुण्गांना जेवण दिले.
कोव्हिड सेंटर आहे की निघोज सारख्या सगळ्यात मोठ्या खेड्यातील म्हणजे ग्रामीण भागातील मोठे हॉस्पिटल आहे. या डॉक्टरांच्या प्रतिक्रियेने संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थांना एक आगळी वेगळी उर्जा मिळाली आहे. सर्वच्या सर्व कोरोना रुण्गांची तपासणी करीत डॉ. सोमवंशी व डॉ. पालवे यांनी काही सूचना करीत मार्गदर्शन केले.
तसेच आम्हाला या ठिकाणी कधीही बोलवा तुम्ही जशी रुग्णांची या ठिकाणी सेवा करुण सेवाभाव करता तोच सेवाभाव व समाजसेवा आमच्या हातून होईल, अशी ग्वाही त्यांनी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. या वेळी मान्यवरांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.
Post a Comment