विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय "स्वाध्याय" उपक्रमास स्थगिती... अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश...


नगर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता पहिली ते नववीसाठी 15 मेपासून राबवण्यात येणार्या विद्यार्थ्याच्या स्वाध्याय उपक्रमास स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे  व राज्यसंघटक राजेंद्र निमसे  यांनी दिली.

राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे म्हणाले की, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने 14 मे 2021 ला विद्या प्राधिकरण, पुणे यांना निवेदन देऊन गेली वर्षभर विद्यार्थ्यांनी कोविड १९च्या या कठीण परिस्थितीत आँफलाइन व आँनलाइन अध्ययन केले आहे.  

राजेंद्र निमसे म्हणाले की, उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना बौध्दिक विश्रांतीची गरज असून शिक्षकही सध्या कोरोना संबधी विविध कामे करत आहेत. या अतिरिक्त कामाचा ताण शिक्षकांवर पडणार असल्याचे म्हटले होते. तसेच घराघरात अनेक रुग्ण असताना या भयग्रस्त वातावरणात कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना हा उपक्रम उन्हाळी सुट्टीत राबवण्याचा अट्टाहास का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

शाळा सुरु झाल्यानंतर या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी व सर्व विद्यार्थ्यांना छापील स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करुन देण्याची मागणी संघटनेमार्फत करण्यात आली होती.

एकूण सध्याची परिस्थिती पाहून व स्वाध्याय उपक्रमास मिळणारा कमी प्रतिसाद लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य  शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे यांच्या कडून उपक्रम सध्या स्थगित करण्यात येत असल्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयाचे स्वागत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे आदींसह शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाढेंकर, जिल्हा कोषाध्यक्ष संजय शेळके, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप भालेराव, पदवीधर जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, सांस्कृतिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर शेळके,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी  ढाकणे, ज्ञानदेव उगले , मधुकर डहाळे,सुधीर रणदिवे , विलास लवांडे, ज्ञानदेव कराड, प्रकाश पटेकर,बापूराव वावगे, मधुकर डहाळे,संजय सोनवणे, नंदू गायकवाड, दत्तात्रय बर्गे, रामराव ढाकणे,राजकुमार शहाणे,पांडुरंग देवकर ,प्रवीण शेळके, अशोक दहिफळे, राहुल व्यवहारे, आदिनाथ पोटे, राजेंद्र गांगर्डे, विनायक गोरे, जनार्दन काळे , बाळासाहेब जाधव ,रवींद्र अनाप, शिवाजी नरवडे, शहाजी जरे , संदीप कडू, प्रकाश कदम, सुखदेव डेंगळे, दिलीप दहिफळे, संभाजी तुपेरे, शिवाजी माने, नवीनकुमार वागजकर, राजेंद्र सुतार, भारत शिरसाठ, अनिल शिरसाठ,लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, संजय सोनवणे, सुनिल कदम,बथुवेल हिवाळे, दिपक सरोदे, सुधीर बोऱ्हाडे, राजेंद्र देशमुख,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दीपाली बोलके,जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके, बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे, जिल्हा उपाध्यक्ष  उज्वला घोरपडे, मनीषा क्षेत्रे ,संगीता निगळे, सुरेखा बळीद, मनिषा गोसावी, अनिता उदबत्ते, सविता नागरे, वर्षा शिरसाठ, वसुंधरा जगताप आदींनी  केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post