शासकीय कोविड सेंटरसाठी उपोषणाचा इशारा...


राहुरी : देवळाली प्रवरा येथील नगरपालिका इमारतीमध्ये सुरू असलेले खाजगी कोविड सेंटर शासकीय करावे किंवा नागरिकांना मोफत सुविधा देण्यासाठी नगरपालिकेने स्वतः ते कोविड सेंटर चालवावे, अन्यथा नगरपालिकेच्या गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की इमारत नगरपालिकेची, पाणी नगरपालिकेचे, वीज नगरपालिकेची, सफाई कामगार नगरपालिकेचे, मग कोविड सेंटरच खाजगी का? असा देवळाली प्रवराच्या नागरिकांना प्रश्न पडला आहे.

 नगरपालिकेच्या मालमत्तेमध्ये खाजगी कोविड सेंटर चालवून रुग्णाला भरमसाठ बिलाची आकारणी कशी काय करू शकता असा सवाल ढुस यांनी निवेदनात केला आहे. 

हे कोविड सेंटर शासकीय करा नाहीतर चले जाव आंदोलन छेडावे लागेल,, असा इशारा दिला होता.  तसेच चार दिवसाचे चाळीस हजार रुपये बिल भरायला पैसे नसल्याने या खाजगी कोविड सेंटरमध्ये अडकून पडलेल्या देवळाली प्रवरा येथीलच रुग्णाला सोडवायला आंदोलन करायची वेळ आल्याने  ढूस यांनी जिल्हाधिकारी यांना आमरण उपोषणाचे निवेदन दिले आहे. 

या निवेदनात ढुस यांनी म्हटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या खाजगी कोविड सेंटरची माहिती मिळणे कामी संदर्भीय पत्रान्वये आम्ही दि. १३ मे रोजी नगरपालिकेला विनंती केली आहे. तथापि आज पावेतो नगरपालिकेने आम्हास माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या खाजगी कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची लूटमार होत असलेबद्दल आमची खात्री झाली आहे. 

या कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी या खाजगी कोविड सेंटरमध्ये आणखी काही बेड वाढवून त्याचे शासकीय मोफत कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे किंवा नगरपालिकेने ते स्वतः चालवावे या बाबत आम्ही नगरपालिकेला वारंवार विनंती केली आहे. त्यावरही नगरपालिकेने अद्याप पावेतो कोणताही निर्णय घेतला नाही. 

या खाजगी कोविड सेंटरची नगरपालिकेकडून माहिती मिळावी, या कोविड सेंटरची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी,  या कोविड सेंटर मध्ये आणखी काही बेड वाढवून ते शासकीय कोविड सेंटर करावे, किंवा नगरपरिषदेने ते  कोविड सेंटर स्वतः चालवीनेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी व येथील नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून कोरोनाची तिसरी लाट येनेपूर्वी देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांना आश्वस्थ करावे, आदी मागण्यासाठी दहा जूनपासून  १० जूनपासून मागण्या मान्य होईपर्यंत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या गेटसमोर उपोषण करणार आहे, असे निवेदनात अप्पासाहेब ढुस यांनी म्हटले आहे.

या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हा पोलिस अधीक्षक, राहुरीचे तहसीलदार व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post