राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी तालुका निहाय हवामान आधारित कृषी सल्ला दिला जातो.```
```मागील वर्षापासून हवामानाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला व्हॉट्सअँपद्वारे देण्यात येतो, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाच्या कृषी विद्या विभागातील प्रमुखांनी दिली.```
```सध्या दिल्या जात असलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामध्ये मागील सात दिवसांच्या हवामानाचे आकडेवारी दिली जाते. तसेच पुढील पाच दिवसांचा सविस्तर हवामानाचा अंदाज आणि हवामान आधारीत पीकनिहाय कृषी सल्ला देण्यात येतो.
दैनंदिन शेतीचे नियोजन करताना सदरील हवामान आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतो. त्यामुळे हवामान आधारित कृषी सल्ला मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी ८४२१०१२१८५ ह्या क्रमांकावर फक्त आपल्या तालुक्याचे नावे व्हाट्सअँपद्वारे मेसेज करावा.
तदनंतर त्या शेतकऱ्यास सदरील तालुक्याच्या ग्रुपमध्ये समाविष्ठ करून त्यांना सदरील तालुक्याकरिताचा हवामान आधारित कृषी सल्ला नियमित प्राप्त होईल.```
```सदरील कृषी सल्ला सुरूवातील नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता असून इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता काही दिवसात त्या त्या जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी संपर्क साधणार आहेत.```
```तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याना विनंती करण्यात येते की, तालुकानिहाय सविस्तर हवामान आधारित कृषी सल्ला मिळविण्याकरिता त्वरित ८४२१०१२१८५ ह्या क्रमांकावर व्हाट्सअँपद्वारे संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, अशी माहिती ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाच्या प्रमुखांनी दिली.```
Post a Comment