जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करा... सदाशिव लोखंडे यांची मागणी....


राहाता :   जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी पोलिसांकडे केली आहे.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आज (शनिवारी) निळवंडे धरणाच्या कामांची पाहणी करताना शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना डावलण्यात आले.  त्यावरून खासदार लोखंडे यांनी नाराजी व्यक्त करत थेट मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 

खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की,  सर्वसामान्य नागरिकांना गर्दी न करण्याचे आदेश आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर तातडीने कारवाई होते मग अधिकारी आणि मंत्र्यांवर का नाही ? गेल्या पाच दशकापासून जिल्ह्यातील शेतकरी ज्या निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट बघत आहेत. त्या धरणाच्या कालव्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहे. 

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निळवंडे धरणाच्या कालव्यांची आज पाहणी केली. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या खासदारांना काही निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना - राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर आला आहे.

खासदार लोखंडे यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यावर काय कारवाई प्रशासनाकडून केली जाते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post