नगर : कर्जत तालुक्यातील गायकरवाडी कोविड सेंटरला आमदार रोहित पवार यांनी अचानक भेट दिली. कोरोनाबाधितांसाठी मनोरंजनासाठी चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम सुरु होता. काही कोरोना रुग्ण सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर थिरकत होते. त्यात रोहित पवार यांनी सहभाग घेतला.
आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुका पंचायत समितीमध्ये कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी दिवसभर अनेक ठिकाणी सांत्वन भेटी दिल्या. दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आमदार रोहित पवार यांनी गायकरवाडी कोविड सेंटरला भेट दिली.
यावेळी कोरोनाबाधीत रुग्णांच्या मनोरंजनासाठी चित्रपटातील गीतांचा कार्यक्रम सुरू होता . आ.पवार यांचा प्रवेश होता. त्यावेळी सैराट चित्रपटातील झिंगाट गाणे सुरू झाले. कोरोना रुग्णाशी सवांद साधण्यासाठी आलेले रोहित पवार यांनी लागलीच झिंगाट गाण्यावर ठेका धरला. या गाण्यावर येथील लहानांसह अबाल वृध्दांनी ठेका धरला होता.
आमदार पवार यांच्या झिंगाट गाण्यावरील नृत्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्याची चांगलीच चर्चा होत आहे. आमदार पवार यांच्यामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment