जिओच्या नव्या स्किमची माहिती आहे का... जिओने आणल्या ग्राहकांसाठी या योजना...


मुंबई : रिलायन्स जिओने नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत. त्याचा ग्राहकांकडून लाभ घेण्यात येत आहे.  आताही परत स्वस्त योजना ग्राहकांना जिओने उपलब्ध करून दिल्या आहेत. 

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना दोन उत्कृष्ट रिचार्ज योजना सुरु केल्या आहेत. त्या 100 रुपयांपेक्षा स्वस्त असून यातील एका योजनेची किंमत 39 रुपये आहे.  जिओने 39 रुपयांच्या रिचार्जवर  14 दिवसांच्या वैधतेसह दररोज  0.5GB डेटा मिळणार आहे. तसेच सर्व नेटवर्कवर दररोज अमर्यादित कॉलिंग व शंभर एसएमएसची सुविधा मिळणार आहे. याव्यतिरिक्त जिओ अँपसची सदस्य विनामूल्य मिळणार आहे. 

जिओच्या 75 रुपयांच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये   28 दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये 3जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. 

या योजनेत, सर्व नेटवर्कवर मोफत कॉल व शंभर एसएमएस करता येणार आहे.  

रिलायन्स जिओच्या या योजनेची किंमत 249 रुपये आहे. योजनेत ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज दोन जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये एकूण डेटा 56 जीबी डेटा मिळणार आहे. योजनेत मोफत कॉल व 100 एसएमएस करता येणार आहे. 

रिलायन्स जिओच्या 75 रुपयांच्या योजनेत ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. यात ग्राहकांना 28 दिवस अमर्यादित कॉलिंगसह एकूण तीन जीबी डेटा मिळणार आहे.  योजनेत  50 नि: शुल्क एसएमएसदेखील करता येणार आहे. 

रिलायन्स जिओच्या 199 रुपयांच्या योजनेत दीड जीबी डेटा देण्यात आला आहे. या योजनेची वैधता 28 दिवसांची आहे. ही योजना प्रति दिन दीड जीबी एकूण 42 जीबी डेटा मिळणार आहे. 

या योजनेत मोफत कॉलिंगचा लाभ मिळणार आहे.  जिओ टू जिओला विनामूल्य कॉलिंग मिळते, तर इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी एक हजार मिनिटे मिळणार आहे. या योजनेत रोज 100 एसएमएसची सुविधाही मिळणार आहे.  

जिओच्या जिओ या योजनेची वैधता 56 दिवसांची आहे. यामध्ये आपल्याला दररोज दीड जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. वैधता दरम्यान एकूण 84GB डेटा उपलब्ध होणार आहे. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग देखील करता येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post