नगर : खतांच्या गोण्यांवर छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. शेतकर्यांनी बी-बियाणे, खते, औषधे खरेदीची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी, तसेच कोरोना संक्रमण काळात नियमांचे पालन करावे, अशी सूचना उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी दिली.
कापसे यांनी कृषी सेवा केंद्रांची पाहणी करून विविध सूचना केल्या. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, मंडल कृषी अधिकारी टकले आदी उपस्थित होते.
कापसे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतः दुकानदाराने व खरेदीदाराने मास्क लावावा, विक्री केंद्रात सॅनिटायझर उपलब्ध करून देत त्याचा स्वतः तसेच खरेदीदाराने वापर करावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे, केंद्रासमोर गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, सुरक्षित अंतर राहण्यासाठी मार्किंग करणे आवश्यक आहेत.
या बाबींचे पालन होत नसल्यास जिल्ह्यातील निरीक्षकांकडून अचानक भेटी देऊन कारवाई केली जाईल. खतांच्या गोण्यांवर छापील किंमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.
शेतकरी गटामार्फत एकत्रित निविष्ठांची मागणी ऑनलाईन पद्धतीने नोंदवून निविष्टा बांधावर पोहोच करण्याबाबत कृषी सेवा केंद्रचालकांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
विक्रेत्यानेसुद्धा आपल्याकडील साठा व दर दुकानात दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. कृषी सेवा केंद्रासाठी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध निर्बंध घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment