कर्जत : प्रामाणिक सेवा ही सेवानिवृत्तीनंतर समाधान देते. त्याची पावती ही सेवानिवृत्तीनंतर समाजात आदर म्हणून मिळते, असे प्रतिपादन कर्जतचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले.
कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे चालक सहाय्यक फौजदार गौतम फुंदे व कर्जत पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रल्हाद लोखंडे यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने, उपनिरीक्षक अमरजीत मोरे,भगवान शिरसाठ यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे व पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.
अण्णासाहेब जाधव म्हणाले की,सध्याच्या परिस्थितीत सुखरूप सेवानिवृत्ती ही एक भाग्याची गोष्ट आहे.आपण आपले काम कर्तव्यावर निष्ठा आणि प्रामाणिकपणाने केले की, सेवेत असताना.
सेवेतून निवृत्त झाल्यानंतर देखील समाजात वावरताना आपला आदर समाज करत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवली पाहिजे. म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ हा समाधानाने जाईल.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, पोलिस हा समाजातील एक लक्षवेधी घटक असतो.अंगावर खाकी वर्दी ही एक समाजात वावरताना आदर निर्माण करते.
आपले प्रामाणिक काम ही नेहमी त्याची प्रतिष्ठा वाढवीत असते. तुमचे काम जसे असेल तसा अनुभव तुमचा असतो.समाजात काम करताना आपण चांगल्याशी चांगलेच आणि वाईटाशी वाईट म्हणजे कायद्याच्या चौकटीत वागले पाहिजे.
आपले हेच काम समाजात विश्वास निर्माण करते.यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची भाषणे झाली. सत्कारमूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
Post a Comment