शिरूर : दहावी-बारावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावरील "आमची शाळा" या ग्रुपच्या वतीने टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉपलर फेटल मॉनिटर, व्हिलचेअर स्ट्रेचर व ओम्रोन बीपी मशीन अशा वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.
आपण ज्या गावात शिक्षण घेतले, खेळलो, बागडलो, लहानाचे मोठे झालो, अशा आपल्या गाव व परिसरातील नागरीक कोरोना संकटाने विचलित झाली आहे. जनजीवन विस्कळित झाले आहे. एकमेकांची मने सैरभैर झाले आहेत. अशा आपल्या समाजबांधवांना मायेचा आधार देण्याची खरी गरज आहे.
या भावतेूनच मदत केली जात आहे. या वस्तू मार्फत नक्कीच सगळ्यांचा फायदा होणार आहे.
यामध्ये विविध जिल्ह्यांत कार्यरत असणारे अधिकारी,व्यवसायिक आहेत. हाच खरा ग्रामस्थांचा अभिमान आहे की, आमच्या गावची मुले शिक्षण घेऊन मोठी झाली. संकटकाळी मात्र आम्हाला ते विसरली नाहीत.
यामध्ये वनअधिकारी संतोष चव्हाण,अरुण सोदक, डॉ. सोनाली शिंदे, ग्रामसेवक भूपेंद्र कांदळकर, संदीप गावडे, विजय थोरात, दत्तात्रय गावडे, विजय पंडीत, दत्तात्रय कांदळकर, राहुल चोरे, मयूर कांदळकर, प्रशांत शितोळे, अनिल बिबवे, भिमाजी घोडे, गणेश टाव्हरे, लहू निचीत, रामदास शितोळे, देविदास बारहाते, शरद गावडे, रघुनाथ कांदळकर, सुवर्णा पानगे, अर्चना शेगर, सारिका सोदक, छाया सोदक यांचे सहकार्य लाभले.
फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला मदत केल्यास इतरांनाही सेवाभावी काम करण्याची प्रेरणा मिळेल.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले गावकरी सक्षम होतील. हा उदात्त विचार घेऊन या माजी विद्यार्थ्यानी या वस्तू या आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केल्या आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, पर्यवेक्षक डॉ. भरत सोदक, विनायक गोसावी, कांदळकर मॅडम उपस्थित होते.
रघुनाथ कांदळकर यांनी सूूत्रसंचालन तर विजय थोरात यांनी आभार मानले.
Post a Comment