पारनेर : संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरु आहे. तालुक्यासह बाहेरील जिल्ह्यातील अनेकजण या कोविड सेंटरला भेट देऊन मदत करीत आहे. या मदतीच्या ओघामुळे या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत.
सांगवीसुर्या गावचे सुपुत्र सुरेश म्हस्के व त्यांच्या पत्नी मंजुषा म्हस्के यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला 21 हजाराची देणगी दिली.
परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील गावा-गावात काम करणारे सामाजिक कामांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाभिमुख कामांचा सातत्याने पुरस्कार करीत आहेत. सचिन भालेकर यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोव्हिड सेंटरला 11 हजाराच्या गोळ्या व औषध भेट दिली आहेत.
भैरवनाथ एंटरप्रायझेसचे सर्वेसर्वा गुणोरे गावचे सुपुत्र योगेश गोपाळे यांनी या कोविड सेंटरला 5555 रूपयांची देणगी दिली आहे. सामाजिक व सेवाभावी कामे करताना योगेश गोपाळे हे गाव मर्यादित न राहता बाहेरील समाजसेवी संस्थेसाठी काय करता येईल याचा विचार करून त्यांनी मोठ्या मनाने मदत केली आहे.
पारनेर शहराचे युवानेते पैलवान युवराज पठारे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या कोविड सेंटरला त्यांनी सपत्नीक भेट देऊन 5555 रुपयांची देणगी दिली आहे.
सामाजिक काम करताना पठारे कुटुंबियांनी सेवाभावी कामांची जाण ठेवली आहे. पैलवान युवराज पठारे यांनी कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवून पारनेर तालुक्याचा नावलौकिक राज्यात केला.
कुशाभाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ दीपक कुशाभाऊ जाधव यांनी संदीप पाटील या कोविड सेंटरला 1111 रुपयांची देणगी दिली आहे.
अविनाश निचीत यांनी कोविड सेंटरला 1111 रुपयांची देणगी दिली आहे.
Post a Comment