शिरुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सावित्राशेठ थोरात यांची कोविड सेंटरला आर्थिक मदत....


शिरूर : शिरुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शसावित्राशेठ थोरात यांनी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला अकरा हजार रुपयांची तसेच मुख्याध्यापक म्हतारबा बारहाते यांनी एक हजाराची   देणगी दिली आहे. 

सावित्राशेठ थोरात यांनी राजकारण करताना सामाजिक कामांना सर्वाधिक योगदान देऊन गाव परिसर विकासाभिमुख कसा होईल. सातत्याने पाठबळ देउन विकासकामांत कार्यरत राहिलेले आहेत. बारहाते गुरूजी यांनीही शिक्षण संस्कृती माध्यमातून चांगले काम करुण गाव व परिसराच्या नावलौकिकासाठी मोठे योगदान दिले आहे. 

ही बारा हजार रूपयांची देणगी या मान्यवरांनी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याकडे सुपूर्द केली. 

यावेळी बबन महाराज थोरात सावकार नाना घोडे, महादू गावडे, बापू मुरलीधर होने, शंकर मुरलीधर होने आदी मान्यवर उपस्थित होते. सावित्राशेठ थोरात व बारहाते गुरूजी यांचे संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post