भालगाव जिल्हा परिषद गटातील परिवर्तन प्रतिष्ठाणचे कार्य कौतुकास्पद... राहुल राजळे यांचे प्रतिपादन...


पाथर्डी : गावागावात कोवीड केअर सेंटरच्या रुपाने रुग्णमंदीरे उभे राहत आहेत. परिवर्तन प्रतिष्ठाणच्या माध्यमातून तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद गटातील खरवंडी कासार, मुंगुसवाडे व मोहोज देवढे या तीन गावात कोविड केअर सेंटर सुरु करुन केलेली सामाजिक सेवा जनतेच्या कायम स्मरणात राहणारी आहे. कोविडचा सामना करताना गावच्या कर्त्या

माणसांनी संघटीतपणे पक्षविरहीत काम केले पाहीजे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांनी केले. 

मोहोज देवढे येथे न्यू इंग्लिश स्कुलच्या इमारतीमधे सोमेश्वर कोविड केअर सेंटरचे उदघाटन राहुल राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, तालुका पशुवैैद्यकीय अधिकारी डॉ. जगदिश पालवे,वपंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे सरपंच अर्चना हाके, उपसरपंच मुक्ता काटे, भाजपा वकील आघाडीचे तालुकाध्यक्ष अँड. संपत गर्जे, अकोला गावचे सरपंच संभाजी गर्जे, नारायण पालवे, गणेश चितळकर, गंगाधर सुपेकर, आजीनाथ देवढे, गोविंद रुपनर, संदीप लोखंडे, सचिन नजन, मनिष उबाळे उपस्थित होते.

राजळे म्हणाले, परिवर्तन प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा डॉ.मनोरमा खेडकर व भाजपाचे तालुुकााध्यक्ष माणिक खेडकर यांनी भालगाव जिल्हा परिषद गटामध्ये तीन कोवीड सेंटर सुरु केले आहेत.आणखीही जिथे गरज असेल तेथे ते सेंटर सुरु करतील.

रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा समजून सध्या कावीड सेंटर ही रुग्ण मंदिरे ठरत आहेत. मोहोज देवढे, अकोला, पालवेवाडी, दातीरवाडी पिंपळगव्हाण, शेकटे, रुपनरवाडी, हाकेवाडी, काळेवाडी,जांभळी येथील कोविड रुग्णांना येथे दाखल करुन आधार देण्याचे काम केले जाणर असल्याचे माणिक खेडकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंंचायत समिती सदस्य सुभाष केेकाण यांनी केेले.  राजेंद्र सावंत यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post