कोरोनाचा करावा लागणार दोन वर्षे मुकाबला.... तिसर्या लाटेचा मुकाबल्यासाठी सज्ज रहावे... डॉ. राजेश डेरे


निघोज : अद्यापही दोन वर्षे आपल्याला कोरोनाशी मुकाबला करावा लागणार आहे. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जनतेने सज्ज राहण्याचे आवाहन मुंबईतील बी. के. सी हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेश डेरे यांनी केले आहे.

निघोज येथील संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोव्हिड सेंटरला नुकतीच  डॉ. डेरे यांनी  भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थांतर्फे यांच्या वतीने त्यांचा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संदीप पाटील कोव्हिड सेंटररची पाहणी करीत त्यांनी संयोजकांचे कौतुक केले यासाठी लागेल ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कोरोना लाटेत जनतेला फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. शासनाचे नियम पाळण्याची गरज असून नियमीत मास्क सॉनिटायझर यांचा वापर करून गर्दीच्या ठिकाणी येउ नये.

आजपर्यंत सरकारने विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांची चांगली व्यवस्था केली आहे मात्र तीसरी लाट सुरू होत आहे. लोकांनी अधिक जागृकतेने दक्षता घेण्याची गरज आहे आपण सुरक्षीत तर आपले कुटुंब सुरक्षीत याची जाण प्रत्येक नागरिकाने ठेवली तर आपण तिसऱ्या कोरोना लाटेचा समर्थपणे मुकाबला करु शकतो काळजी घ्या सुरक्षित राहा असा संदेश डॉक्टर डेरे यांनी दिला. 

डॉक्टर राजेश डेरे हे पारनेर तालुक्यातील रेनवडी गावचे असून गेली अनेक वर्षांपासून ते मुंबईत आहेत.

मुंब‌ई येथील सर्वात मोठ्या कोव्हिड सेंटर असलेल्या बी के सी हॉस्पिटलचे डीन असून गेली वर्षभरात त्यांनी हजारो कोरोना रुण्गांची काळजी घेउन लाखो  

रुण्गांना जिवदाण देण्याचे महत्त्वाचे काम केल्याने राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिंनी त्यांचें कौतुक केले आहे. गानसम्राज्ञी लता दिदी मंगेशकर यांनी पत्र पाठवून डॉक्टर राजेश डेरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

निघोज येथील बांधकाम व्यावसायिक यशवंत वाढवणे यांचे ते मेव्हणे असून सचिन पाटील वराळ यांच्या सामाजिक कामांची माहिती घेऊन त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांनी आवर्जून संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोविड सेंटरला भेट देऊन येथील सर्व रुण्गांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले आहे.

मुंबईत असणाऱ्या पुणे नगर जिल्ह्यातील लोकांशी त्यांचा नियमीत संपर्क आहे .कुणाही व्यक्तीला तो राज्यातील किंवा परराज्यातील कुठलाही असला तरी त्याची आस्थेने चौकशी करुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारे व्यक्तीमत्व म्हणून डॉक्टर राजेश डेरे यांचा नावलौकिक आहे. 

यावेळी डॉ. अजित लंके, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सुनिल पवार, डॉक्टर संदेश थोरात, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, ग्रामपंचायत माजी सदस्य भिमराव लामखडे, बांधकाम व्यावसायिक यशवंत वाढवणे, विलासराव हारदे, सुनिल वराळ पाटील, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार,फाउंडेशनचे प्रसिद्धी प्रमुख अविनाश वराळ, कैलास जगताप, संतोष वराळ, आरोग्य सेविका सुमन शेटे आदी उपस्थित होते.

शिरुर येथील वेदांत हॉस्पिटलचे संचालक डॉ सोमवंशी व डॉ पालवे यांनी कोव्हिड सेंटरला भेट देऊन प्रत्येक रूण्गांची आस्थेने चौकशी करुन तपासणी केली. यावेळी डॉक्टर विक्रम वराळ डॉ संदेश थोरात उपस्थित होते. डॉक्टर सोमवंशी व डॉ पालवे यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटर म्हणजे ग्रामीण भागातील अद्ययावत हॉस्पिटल आहे. 

संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ रूण्गांची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी देवदूतासारखे काम केल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post