नगर : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती उल्लेखनिय पध्दतीने हाताळायची असेल आमदार निलेश लंके यांना पालकमंत्री करून जिल्ह्याची सूत्रे त्यांच्या हाती द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील आमदारांमध्ये फक्त आमदार निलेश लंके यांचेच काम उल्लेखनिय झालेले आहे.
जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केलेला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिला रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.
ज्या वेळी रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले होते. त्यावेळी आमदार निलेश लंके यांनी पुढाकार घेत 1100 बेडचे कोविड सेंटर सुरु केले. त्यामुळे सर्वसामान्यांना वेळेत उपचार मिळू लागले आहे.
आमदार लंके यांचे अनुकरण जिल्ह्यातील मग इतर नेत्यांनी सुरु केले. प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर सुरु झाले. मात्र लंके यांनी कोविड सेंटर सुरु करून स्वत: तेथे उपस्थित राहून रुग्णांची सेवा केली. त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
जिल्ह्यातील जे इतर नेत्यांना जमले नाही ते लंके यांनी करून दाखविले आहे. त्यामुळे ते सर्वसामान्यांचे लोकप्रिय नेते झालेले आहेत.
लंके यांनी कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊनत्यांना मंत्री पदाची संधी देणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती सरकारला सुधारवयाची असेल तर त्यांनी आमदार लंके यांना पालकमंत्री बनवून जिल्ह्याची सूत्रे लंके यांच्या हाती दिल्यास नक्कीच परिस्थिती सुधारणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मागणी सुरु केलेली असून तसे पत्रव्यवहार करण्याचा मानस काहींनी व्यक्त केला आहे.
Post a Comment