पारनेर ः पारनेर तालुक्यात गेल्या अनेक अनेक वर्षांपासून शेतकर्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा शिव पानंद शेतरस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. हे प्रश्न साेडविण्यासाठी आधार फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. तहसीलदर ज्याेती देवरे यांची भेट घेऊन त्यांचे त्याकडे लक्ष वेधले. हा प्रश्न काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मार्गी लावू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले आहे, अशी माहिती आधार फांउडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांनी दिली.
पवळे म्हणाले की, पारनेर तालुक्यात सुरु केलेल्या शेतरस्ता चळवळीला अनेक संकटांना तोंड देत शेतकर्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम शेतकर्यांनी केले. वेळोवेळी तहसीलदारांची पारनेरमध्ये होणारी बदली हे चळवळीतून उभ्या झालेल्या शिवपानंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीसमोर आव्हानच होते.
त्यातच शेतकर्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आवाज दो आंदोलनाचा लढा उभारणार्या पत्रकाचे राळेगणसिध्दीत अनावरण केले. अण्णांनीही लढ्याला पाठिंबा दर्शवला. त्यातच समितीने पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, भूमिअभिलेख, महसूल प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सप्तपदी अभियात शिव पानंद शेतरस्त्यांच्या कामाच्या पूर्ततेसाठी जनजागृती चालू केली.
पारनेरच्या तहसीलरांसमवेत शेतकर्यांनी बैठक घेऊन प्रशानासोबत राहून काम करण्याचा समितीने निर्णय घेतला. त्यातच याकार्याला व्यापक करण्यासाठी पद्मश्री पोपटराव पवारांचे मार्गदर्शन कार्यक्रम हिवरे बाजार येथे ठेवत शेतकर्यांनी आधार फांउडेशनचे अनावरण हिवरे बाजार येथे करण्यात आले. त्यातच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र लाॅकडाउन झाल्यामुळे शेतरस्त्यांच्या प्रश्नावर काम करणे मोठे कठीण होऊन बसले, असे पवळे म्हणाले.
पारनेर व श्रीगोंदा हद्दीतील शेतरस्ता पारनेरच्या तहसीलदांरांनी पूर्ण केला याची माहिती शेतकर्यांना समजल्यामुळे अडचणीत असणार्या शेतकर्यांनी फोनवर चर्चा केली. शेवटी तहसीलदारांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदारांचे कोरोनात केलेल्या कामाबद्द धन्यवाद व्यक्त केले. त्यातच कडूस व श्रीगोंदा येथील रस्ता सोडवल्याबद्दल आभार मानले.
कोरोना सदृश्य परिस्थिती नियंत्रणात येताच तातडीने प्रथम प्राधान्याने शेतरस्त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन तहसीलदार ज्योती देवरे यांनी आधार फांउडेशनचे शरद पवळे, संजय कनिच्छे, विजय मल्लाव यांना भेटीरम्यान देण्यात आले. शेतकर्यांनी आपापसात कुठलाही संघर्ष न करता अशा परिस्थितीत प्रशासनासोबत राहून आपल्याला न्याय मिळवणे गरजेचे आहे, असे पवळे म्हणाले.
अनेक वर्ष, अनेक पिढ्या संघर्ष करताना आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे परिस्थितीनुरुप आपण कार्य करत आहोत. नक्कीच आपल्या सर्वांना न्याय याठिकाणी मिळणार असे आधार फांउडेशनचे संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांनी सांगितले.
Post a Comment