निघोज : संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटर म्हणजे एक गोरगरीब गरजू लोकांसाठी उभारलेले एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद खंडपीठातील प्रसिद्ध वकील नितीन गवारे यांनी केले आहे.
ॲड. गवारे यांनी नुकतीच संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांचा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते राजेंद्र गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, ॲड. संकेत ठाणगे, संदीप पाटील वराळ युवमंचचे पदाधिकारी सुनिल पवार, सुनिल वराळ पाटील, अल्पसंख्याक समाजाचे मार्गदर्शक अस्लम इनामदार आदी उपस्थित होते.
ॲड. गवारे म्हणाले की, कोरोनाचा थोडा त्रास झाला तरी औषधउपचार घेण्यासाठी घरी कॉरंटाइन न होता कोविड सेंटरला चार दोन दिवस थांबले तरी आपण कोरोनाला हद्दपार करु शकतो.
यासाठी राज्य सरकारने कोविड सेंटरसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. संदीप वराळ पाटील जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित या कोविड सेंटरला मोठा लोकसहभाग मिळाला आहे.
ही अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून गोरगरीब समाजाला फार मोठा आरोग्य आधार देण्याचे काम सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. अशाप्रकारे गावोगाव कोविड सेंटर होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
ॲड. गवारे यांनी यावेळी कोविड सेंटरची पाहाणी करीत कोरोना रुण्गांशी संवाद साधला.
Post a Comment