निघोज : येथील संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला १५ हजार रूपयांची देणगी आज अमेरिका येथून देविदास घोरपडे यांनी केेली आहे. त्यांनी ही मदत वडील मुलिकादेवी माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त वरिष्ठ लेखणीक रावसाहेब घोरपडे व मातोश्री यांनी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याकडे सुपूर्द केली.
देवीदास घोरपडे गेली अनेक वर्षांपासून अमेरिकेतील नामांकित कंपनीत कार्यरत आहेत. मात्र ज्या गावात आपले बालपण व शिक्षण झाले त्या जन्मभूमीचा आदर करण्यासाठी देवीदास यांनी अमेरिकेतून देणगी पाठवली.
आई वडील यांच्या सामाजिक कामांची प्रेरणा घेत अमेरिकेत असूनही ना पदाचा गर्व ना अभिमान गावची आठवण ठेवत देवीदास घोरपडे यांनी जी १५ हजार रूपयांची देणगी देऊन लाखमोलाची मदत केली. त्या बद्दल घोरपडे व कुटुंबियांना आभार मानले.
Post a Comment