निघोज : कोरेना या महाभयंकर आजाराचा सामना सर्व तालुकावासीय करत आहे. अशातच तालुक्यात कोविड सेंटर सुरु झाले. त्यामुळे कोविड रुग्णाची मोफत उत्तम सोय झाली आहे. मात्र कोविड सेंटर चालवताना मोठा खर्च होत आहे.
शिवबा संघटनेच्यावतीने कर्तव्य म्हणून खारीचा वाटा उचलण्याच्या भावनेतून मदत केली. तालुक्यातील सर्व कोविड सेंटरला भेट देऊन कोरोना रुण्गांचीची विचारपूस करून कोविड सेंटरला छोटीशी मदत करण्यात आली.
तालुक्यातील निघोज येथील संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर, पारनेर येथील डॉ. श्रीकांत पठारे संचलित आरोग्य मंदिर, भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर, टाकळी ढोकेश्वर येथील स्व. वसंतराव झावरे पाटील आरोग्य मंदिर व कान्हूर पठार येथील आझाद ठुबे संचलित कोविड सेंटर यांना मदत करण्यात आली. कर्तव्यनिधी देणाऱ्या सर्व देणगीदारांचे शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी आभार मानले आहेत.
यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे,शिवबा संचालक स्वप्नील लामखडे, पत्रकार भास्कर कवाद, शिवबा पदाधिकारी निवड समिती प्रमुख राजू लाळगे, लहू गागरे, एकनाथ शेटे, शिवबा विद्यार्थी संघटना तालुकाप्रमुख मच्छिंद्र लाळगे, नागेश नरसाळे, गणेश नरसाळे, शिवबा अल्पसंख्याक तालुकाप्रमुख भैय्या पठाण, प्रितेश पानमंद, शिवबा पारनेर शहरप्रमुख निलेश दरेकर, गणेश चत्तर, अमोल ठुबे, यशोदिप रहाने अक्षय जाधव , अंकुश अडसूळ, यश अडसूळ आदी सहकारी उपस्थित होते.
शिवबा संघटनेने आजपर्यंत शिवजयंती उत्सवासहीत धार्मिक सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले आहेत. गाव व परिसरातील विकासाभिमुख कामांना पाठबळ देण्यासाठी शिवबा संघटनेने मोठे योगदान दिले आहे.
शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवलेल्या तालुक्यातील कोविड सेंटरला कर्तव्य भावनेतून मदत या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment