नगर : जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी वार्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब वाक्याची घटना घडली.
यास चक्रीवादळाचा आतापर्यंत सर्वात जास्त तडाखा पश्चिम बंगाल व ओडिशाला बसला आहे. या दोनही राज्यातमध्ये मिळून 15 लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक कोटी लोकांना फटका बसला आहे. या यास चक्रीवादळाचा फटका आता महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आगामी तीन दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली होती. ती खरी ठरली आहे.
सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. पाऊस येईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. जिल्ह्यात आज शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक भागात पाणीच पाणी झाले होते. जिल्ह्यात काही ठिकाणी दुपारपासूनच पावसाला सुरवात झाली होती.
नगर शहरात रात्री उशिरा पावसाला सुरवात झाली. मेघगर्जनेसह पाऊस झाला. जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर, अकोले, कर्जत, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदे आदी भागात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले होते.
Post a Comment