आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेतर्फे संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला देणगी...


पारनेर : सैनिक म्हटले की देशसेवा मात्र देशसेवा करताना आजी माजी सैनिकांनी व सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या आजी माजी अधिकाऱ्यांनी समाजसेवेला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे अनेक उदाहरणे आपण प्रत्यक्ष पाहिली आहेत. निघोज व परिसरातील आजी-माजी सैनिकांनी एकत्र येऊन सेवाभावी संस्था स्थापन केली आहे.

कारगील विजय दिन असो किंवा इतर राष्ट्रीय कार्यक्रमाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम करीत ही संस्था परिसराला देशप्रेमी संदेश देण्याचे काम करीत असतात. आपला गाव व परिसरातील सामाजिक संस्थांना सातत्याने पाठबळ देण्याचे काम ही संस्था सातत्याने करीत असते. गाव व परिसरातील जनतेला अभिमान वाटतो. अशा प्रकारे या संस्थेचे काम गौरवास्पद आहे. या आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेने संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला 42 हजार 821 रूपयांची देणगी दिली आहे. 

संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना या संस्थेने आशिर्वादरूपी मदत केली आहे.

सातत्याने निघोज व पंचक्रोशीतील विकासाभिमुख पाठबळ देणारी ही आजी माजी सैनिकांची सेवाभावी संस्था गावविकासाला मिळालेले वरदान असल्याने अभिमानाने सांगण्यास आम्हाला आनंद वाटत आहे. या संस्थेच्या आजी माजी सैनिकांनी 42 हजार 821 रूपयांची देणगी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी कॅप्टन विठ्ठलराव वराळ, वॉरंट ऑफिसर पोपटराव लंके सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक सहादू वराळ, मेजर रघुनाथ लंके मेजर विकास वराळ मेजर गोपाळराव वराळ, मेजर विजय वराळ, मेजर दगडू डेरे, मेजर महादेव पाटील, मेजर अमोल ठुबे, मेजर संभाजी ढोणे, मेजर माऊली शेटे, मेजर माऊली रसाळ, मेजर मंजाभाऊ गुंड आदी तसेच आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे अधिकारी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1/Post a Comment/Comments

  1. TRIBUTE TO OFFICERS THEY HAVE GIVEN A BIG LESSON TO MANY PEOPLE FOR DONATION THAT IF YOU DONATE YOU WILL BE SUFFICIENT BY WEALTH AND ALSO BY POSTIVITY THANKYOU VERY MUCH FOR DOING SUCH A DONATION FOR US BIG TRIBUTE TO ALL OF THE LEGENDS OF INDIA FOR DONATING FOR HELPING US AND ALSO NOT SEEEING ANY RELIOGN
    NOT HINDU NOT MUSLIM NOT ANY THING ELSE FOR EVERYONE THANKYOU VERY MUCH OFFICERS I AM GETTING A FRESH POSITIVE VIBE BY SEEING YOU ALL THANKYOU AGAIN.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post