पाथर्डी : उत्तम नेतृत्वगुण, कुशल प्रशासक, आदर्श समाजकारण, लोकप्रिय व उत्तुंग व्यक्तीमत्व ज्यांच्या जीवनावरील पुस्तके वाचल्यावर नवीन कार्याची प्रेरणा मिळते. डोळ्यात पाणी व अंगावर शहारे येतात. अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर वाटचाल करून कृती करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौड यांनी केले.
तालुक्यातील रूपनरवाडी येथे संगमेश्वर मित्र मंडळातर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोरोनाचे सर्व शासकीय निकष पाळून अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्याक्ष अंकुश बोके, भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख नारायण पालवे, माजी सरपंच गणेश चितळकर, अक्षय दातीर, प्रेमचंद खंडागळे, मनीष उबाळे, भाऊराव रुपनर, ग्रामपंचायत सदस्य रामनाथ वाघमोडे, रामकिसन चितळकर,अनिल रुपनर, बाळासाहेब काळे, आदिनाथ देवढे, अशोक रुपनर, सुनिल वाघमोडे, दिनकर रुपनर, शेषराव रुपनर, आसाराम आंधळे, ग्रामसेवक सचिन नजन आदी उपस्थित होते.
दौंड म्हणाले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा संगमेश्वर मित्रमंडळाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व योग्य आहे.
राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी पतीच्या निधनानंतर अंधश्रध्दा व जुन्या रूढी परंपरांना छेद देत सती न जाता रयतेच्या हितासाठी राज्यकारभार सुरू ठेऊन अन्यायाविरोधात तलवार हातात घेऊन जनतेचे रक्षण करून हिताचे निर्णय घेतले.
राज्यातच नव्हे तर देशभर मोठे कार्य केले. अनेक मंदिराचे जीर्णोद्धार केले. घाट बांधले, पाणवठे निर्माण केले.
अशा या महान नेत्यांच्या कार्याची नवीन पिढीला ओळख व्हावी व त्यांचे कार्य अखंडपणे वर्षानुवर्ष असेच पुढे चाली रहावे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही दौंड म्हणाले.
प्रा. गोविंद रूपनर यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक तर महादेव नरोटे यांनी आभार मानले.
Post a Comment