एम. व्ही. देशमुख
नगर ः सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर काेविड सेंटरमध्ये आमदार राेहित पवार यांनी ठेका धरल्यावर सध्या विराेधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. परंतु हा ठेका धरल्यामुळे काेविड सेंटरमधील रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले हाेते. हा आनंद टीकाकारांनी अगाेदर पहाणे गरजेचे आहे. मगच टीका करावी, असे मत आता सर्वसामान्यांमधून व्यक्त केले जात आहे. काेराेना काळात तरी राजकारण टाळा, असे मत आता व्यक्त हाेऊ लागलेले आहे.
कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील काेविड सेंटरला आमदार राेहित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी तेथे संगीताचा कार्यक्रम सुरु हाेता. आमदार पवार काेविड सेंटरमध्ये पाेहचले. त्याच वेळी तेथे सैराट चित्रपटातील झिंगाट गाणे सुरु हाेते. यावेळी काहींनी या गाण्यावर ठेका धरलेला हाेता. तर काहीजण नुसते पहात बसलेले हाेते. काहींनी आमदार आल्याने ठेका धरलेला अर्ध्यावर साेडला हाेता. त्यांचा झालेल नित्साह पाहून त्यांनाही बरे वाटले नसेल.
रुग्णांना बरे वाटावे, आमदार नव्हे तर सर्वसामान्य आल्याची भावना व्हावी, या उद्देशाने त्यांनी हा ठेका धरला असू शकताे, याचा विचार टीकाकारांनी करणे गरजेचे आहे. त्यांच्या या ठेका धरण्यामुळे रुग्णांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले हाेते. विशेष म्हणजे या गाण्यावर झालेल्या डान्सच्या वेळी समायिक अंतर राखण्याचा पुरेपुर प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.
सध्याच्या परिस्थितीत एकमेकांना आनंद देणे गरजेचे आहे. तसाच काहीचा प्रयत्न आमदार राेहित पवार यांनी केलेला आहे. त्यावर सध्याच्या काळात टीका करणे चुकीचे आहे. असा प्रकार पुन्हा करू नका, अशी सूचना केली तर ती उचित राहणार आहे. मात्र फक्त आपल्या विराेधकांवर टीका करायची म्हणून फक्त चूक शाेधून त्यावर टीका करत बसणे उचित ठरणारे नाही.
विशेष म्हणजे काेराेना रुग्णांजवळ जवळचे जायला भीतात, अशा परिस्थितीत आमदार राेहित पवार काेविड सेंटरमध्ये जाऊन त्या रुग्णांसमवेत झिंगाट गाण्यावर ठेका धरतात, हे काैतुकास्पद आहे. असे दृश्य पाहिल्यानंतर विराेधकांनी काळजी घ्या... असा सल्ला दिला असता तर निश्चित ताे माेलाचा ठरला असता. मात्र विराेधकांकडून थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी चुकीची आहे.
सध्याच्या काळातील त्यांची ही मागणी त्यांच्याच कमी करणारी ठरणार आहे. सध्या साेशल मीडियावर आमदार राेहित पवार यांचा झिंगाट गाण्यावरील ठेका चर्चेता विषय ठरलेला असून सर्वचस्थरातून त्यांचे काैतुक हाेत आहे.
Post a Comment