अन्यायकारक इंधन दरवाढ रद्द करा... जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल... राजेश्वरी कोठावळे यांचा इशारा..


पारनेर ः
देशातील जनता कोरोनामुळे आधिच त्रस्त आहेत. अशातच केंद्र सरकारने गँस, पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली.  अशा परिस्थितीत सर्व सामान्य माणसांचे जगणे मुश्कील केले. ही अन्यायकारक इंधन दरवाढ रद्द करा, अशी मागणी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी केली आहे.

याबाबत काेठावळे म्हणाल्या की, इंधन व गॅसची सातत्याने दरवाढ होत आहे. या दरवाढीचा राज्यातील राष्ट्रवादी युवती व महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने  निषेध करण्यात येत आहे. 2014 पूर्वी भाजप नेते इंधन दरवाढीवरून आरडाओरडा करत होते. परंतु तेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करून जनतेची लूट करत आहेत. दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. 

जनतेच्या खिशातील पैसे अन्यायकारक पद्धतीने लुटले जात आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही. केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, असा आरोप जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी यावेळी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post