पाथर्डी ः तालुक्यातील नागरिकांनी जनता कर्फ्युला दिलेल्या उस्फूर्त प्रतिसाद, प्रशासन व व्यापारी यांचा सत्कारात्मक समन्वय, व व प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमाचे फलस्वरूप तालुक्यातील कोरोना लागण होण्याचा संसर्ग दर अवघा 12 टक्क्यांवर आल्याने कोरोना साथ आटोक्यात येईल, असे वाटत आहे. यामुळे नागरिकांच्या मनातील भीती व सामाजिक तणाव निवळू लागला आहे.
प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, वैद्यकीय
अधीक्षक डॉ. अशोक कराळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, तालुका
गट विकास अधिकारी शीतल खिंडे, पालिका मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासह
संबंधित विभागातील सर्व कर्मचारी गेल्या महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम
घेत आहेत.
प्रशासनाच्या उत्तम समन्वयामुळे जनता कर्फ्यू यशस्वीरित्या पूर्ण
झाला. नागरिकांनी सर्व प्रकारचा त्रास सहन करत यासाठी मोठे योगदान दिले.
या पूर्वी साठ टक्क्यांपर्यंत रुग्ण बाधित यांचा संसर्ग दर पोहोचला होता.
तो आता घटून अवघा 12 टक्क्यांवर आल्याने आगामी काळात ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट यावर अधिक भर देत तर दुसऱ्या बाजूने लसीकरणाचे नियोजन अधिक
प्रभावी करून तालुक्यातून कोरोना लवकरात लवकर हद्दपार करण्यासाठी
प्रशासनाने कंबर कसली आहे.
वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे व नियमांचे
जनतेने पालन केल्यास कोरोना मुक्त तालुका नजीकच्या काळात शक्य होईल. असा
विश्वास तालुका इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार श्याम वाडकर यांनी व्यक्त
केला. येत्या एक तारखेपर्यंत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जाहीर
केलेल्या नियमावलीची तालुक्यात अंमलबजावणी होईल.
सुधारित आदेशानुसार
अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा, किराणा दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत
पूर्णपणे उघडी राहतील. अन्य सगळे व्यवसाय मात्र बंद राहतील. यामुळे
नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Post a Comment