श्रीगोंदा : जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंद्यातील नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे तालुक्यातील विविध कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णासाठी 2100 बिस्कीट पुडे, पाण्याच्या बाटल्या , केळी आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. लंके यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रत्येकाने आपला व आपल्या प्रियजनांचा वाढदिवस अशा प्रकारे कोविड सेंटरमध्ये साजरा करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोविड सेंटरला आपल्याकडून फूल नाही, पण फुलाची पाकळीची मदत होऊ शकते, असे आव्हान नीलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सुभान तांबोळी यांनी केले .
यावेळी प्रतिष्ठान उपाध्यक्ष आकाश परदेशी, विजय काळाने, श्रेयस गांधी,गायकवाड़, आदित्य लोखंडे, चैतन्य आजबे , खोमने,अजय सिदकर,ओमकार अनभुले आदी उपस्थित होते.
यावेळी रुग्णांच्या भेटी घ्ऊन त्यांची चौकशी करून त्यांना धीर देण्याचे काम प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी केले.
Post a Comment