शिरूर : वाढदिवस लग्नाचा असो की स्वत:चा प्रत्येक घरात तो आनंदाचा क्षण असतो. त्या आनंदात प्रत्येकजण आपल्या प्रियजनांना सहभागी करून घेत असतो. मलठणचे माजी सरपंच सुहास थोरात यांनी आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला. त्यांचे सर्वस्वतरातून कौतुक होत आहे.
थोरात यांनी छापल्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त टाकळी हाजी, मलठण, पाबळ येथील कोविड सेंटर मधील रुग्नांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी दिली.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, मिना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे, अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, युवानेते प्रमोद तांबडे, सपंत गायकवाड, अतुल थोरात, नवनाथ दंडवते, अविनाश थोरात सर, डॉ गमे, आरोग्य सेविका सुवर्णा थोपटे, शशिकला पानगे आदी उपस्थित होते.
Post a Comment