पारनेर : महादेव वराळ साहेब व माधुरी महादेव वराळ हे दाम्पत्य अमेरिकेत आहे. त्यांच्या 39 वा लग्नाचा वाढदिवस आज 31 मे ला होता. सेवाभाव जपण्यासाठी त्यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला अमेरिकेतून 11 हजार रूपयांची देणगी पाठवली आहे.
महादेव बाळा वराळ व माधुरी महादेव वराळ उच्चशिक्षित कुटुंब. वराळ यांचे बालपण निघोज येथे गेले, असले तरी माध्यमिक व उच्च शिक्षण मुंबईत झाले आहे. जी. एस. महानगर बॅंकेचे माजी संचालक आर. सी. एफ कंपनीचे निवृत्त वरिष्ठ इंजिनिअर या पदावर कार्यरत असताना लोककल्याणार्थ काम त्यांनी केले आहे.
तालुक्यात आले तरी शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल, यासाठी बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुनिल दादा पवार, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, गावातील अधिकारी पदाधिकारी यांच्याशी चर्चा करीत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले आहेत.
मुंबईतील पारनेर स्थायिक जनतेसाठी सातत्याने सामाजिक काम करीत समाजकारणाच्या माध्यमातून लोकविकासार्थ अनेक योजना राबविल्या आहेत. त्यांच्या पत्नी माधुरी वराळ यांचे शिक्षण एम ए बी एड असून त्यांनीही शिक्षण क्षेत्रात मुंबईत उत्तम शैक्षणिक कार्य करीत आहेत.
आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. सामाजिक कामात सातत्याने सहभागी होत या वराळ दांपत्याने गाव व परिसरातील विकासाभिमुख कामांसाठी मार्गदर्शन करीत गावांतील सामाजिक संस्थांना पाठबळ देण्याचे काम केले आहे.
सामाजिक शैक्षणिक व आर्थिक संस्थांच्या माध्यमातून वराळ परिवाराने आपल्या कार्याचा नावलौकिक गाव ते मुंबई असा सामाजिक प्रवास करीत नावलौकिक मिळविला आहे. लग्नाच्या वाढदिवसनिमित्ताने वराळ दाम्पत्याने अमेरिकेतून 11 हजाराची देणगी संदीप वराळ पाटील कोविड सेंटरला दिली आहे.
वराळ यांचे बंधू सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक सहादू वराळ यांनीही दहा मे रोजी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला पाच हजार रूपयांची देणगी दिली होती.
मुंबईत असूनही वराळ कुटुंबियांनी निघोज व परिसरातील शैक्षणिक धार्मिक सामाजिक कामांना सातत्याने पाठबळ देत आहेत. गावातील विकासाभिमुख कामांना पाठबळ देत गावच्या विकासासाठी सातत्याने मदत करीत आहेत.
Post a Comment