हजेरी पुस्तिकेचा अनेकांनी घेतला धसका

 


नगर ः जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाने आज (बुधवारी) सर्व विभागातील हजेरी पुस्तकांची अचानक तपासणी केली. 

जिल्हा परिषदेचे कामकाज सध्या 15 टक्के उपस्थितीवर सुरु आहे. हा आदेश 15 मेपर्यंतच हाेता. नव्याने अद्याप आदेश झालेला नाही. त्यातच आज सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागातील विशेष म्हणजे या हजेरी पुस्तकाची अचानक तपासणी केली. या हजेरी पुस्तकाच्या तपासणीने कर्मचार्यांचे धाबे दणाणले हाेते. 

जिल्हा परिषदेचे 15 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीवर कामकाज करण्यासंदर्भात नव्याने अध्यादेश पारीत केलेला नाही. त्यातच अनेकजण ताे आदेश येईल, असे गृहित धरूनच कार्यालयात उपस्थिती लावत आहे. त्यातच आज सामान्य प्रशासन विभागाने अचानक हजेरी पुस्तकाची तपासणी केली. त्यामुळे जे घरी हाेते, त्यांचे चांगलेच धाबे दणाणले हाेते. आता आपल्यावर कारवाई हाेणार अशीच शक्यता सगळ्यांना लागली हाेती. जे कार्यालयात हाेते, त्यांची हजेरी पुस्तक नेमके का तपासले याची त्यांना माहिती हाेत नसल्याने त्यांच्यातही भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. 

दरम्यान,सामान्य प्रशासन विभागाकडून 15 टक्के उपस्थितीवर कामकाज चालत आहे की त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयात येत आहे का. याची पडताळणीसाठी हजेरी पुस्तक तपासले असल्याची दुपारी स्पष्ट झाल्यानंतर सर्व कर्मचार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

आदेश नसताना अंमलबजावणी कशी 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी 15 टक्के उपस्थितीवर कामकाज चालवावे, असा कुठलाही आदेश पारीत केलेला नसताना जिल्हा परिषदेतील कामकाज 15 टक्के उपस्थितीवर नेमके काेणाच्या आदेशावर सुरु आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post