नगर ः दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव आज (गुरुवारी) झाले. यामध्ये कांद्याची सुमारे सहा हजार कांदा गाेण्यांची आवक झाली हाेती. एक नंबर कांद्याला सर्वाधिक 1200 रुपयांचा भाव मिळाला.
नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या सह हजार 167 गाेण्यांची आवक झाली हाेती. एक नंबर कांद्याला 900 ते 1200, दाेन नंबर कांद्याला 600 ते 900, तीन नंबर कांद्याला 400 ते 600, चार नंबर कांद्याला 200 ते 400 रुपयांचा भाव मिळाला हाेता.
शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून आणावी, असे अावाहन बाजार समितीतर्फे करण्यात आलेले आहे. कांद्याला मागणी कमी असल्यामुळे त्याचा परिणाम भावावर हाेत आहे.
Post a Comment