प्रत्यक्ष आदेश निघेपर्यंत लसीकरणाबाबतचा पाठपुरावा प्राथमिक शिक्षक परिषदेचा सुरूच राहणार ः प्रविण ठुबे

नगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे जोपर्यंत लसीकरण होत नाही. तोपर्यंत शिक्षकांना कोविड संदर्भातील कोणतीही कामे देण्यात येऊ नयेत. प्राथमिक शिक्षकांना लसीकरणाबाबत तात्काळ आदेश निर्गमित करण्यात यावेत. प्रत्यक्ष आदेश निघेपर्यंत लसीकरणाबाबत पाठपुरावा प्राथमिक शिक्षक परिषद सुरूच ठेवणार आहे, अशी माहिती परिषदेचे जिल्हाधक्ष प्रविण ठुबे व विकास डावखरे यांनी दिली आहे. 

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने पुकारलेल्या आत्मक्लेश आंदोलनासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे व शिक्षक परिषद संस्थापक आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडे केली आहे. 

आज आंदोलनासंदर्भात परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले, उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष आर. पी. राहाणे, संगमनेरचे गुरुमाऊली मंडळ अध्यक्ष संतोष भोर यांनी डॉ तांबे यांची संगमनेर येथे निवासस्थानी भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली. आपल्या जिल्ह्यातील 36 शिक्षक कोरोनामुळे बळी गेले आहेत. पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांत शिक्षकांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण झालेले आहे. 
 
तद्नंतर डॉ. तांबे यांनी जिल्हाधिकारी भोसले यांना तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांना फोन करून जोपर्यंत लसीकरण होत नाही. तोपर्यंत शिक्षकांना कोविड संदर्भातील कामे देऊ नयेत व शिक्षकांच्या लसीकरणाबाबत तात्काळ आदेश निर्गमीत करावेत, अशी विनंती केली. 
 
त्याचप्रमाणे या संदर्भात जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी आमदार संजय केळकर यांना तसेच राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांना आंदोलनाबाबत माहिती दिल्यानंतर आमदार केळकर यांनी देखील तात्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाला याबाबत सूचना करून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. प्रत्यक्ष आदेश निघेपर्यंत लसीकरणाबाबत पाठपुरावा प्राथमिक शिक्षक परिषद सुरूच ठेवणार आहे, अशी भुमिका परिषदेचे जिल्हाधक्ष प्रविण ठुबे व विकास डावखरे यांनी घेतली आहे. 

जिल्ह्यातील शिक्षकांच्या लसीकरणाबाबतचे स्वयंस्पष्ट आदेश निघत नाहीत. तसेच 100 टक्के शिक्षकांचे लसीकरण जोपर्यत होत नाही, तोपर्यंत शिक्षक परिषद आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत लस दिली जात नाही. तोपर्यंत शिक्षकांनी कोविड संदर्भातील कोणतीही कामे करु नयेत. आ. डॉ. सुधीर तांबे व आ. संजय केळकर यांनी शिक्षकांना न्याय देण्याबाबतच्या घेतलेल्या भूमिकेबद्दल शिक्षक परिषदेने त्यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post