नगर ः जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या लसीकरणाकरिता शिक्षक परिषदेने दिलेल्या आंदाेलनाचा इशारा दिला. तसेच शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांनी आज स्वत: जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांसमवेत आज सकाळी साडेअकरा वाजता दूरध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर गतिमान हालचाली झाल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे समवेत बैठक पार पडली.त्यामध्ये आज लसीकरणाबाबत सकारात्मक आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून संघटनेला मिळाले आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिली.
ठुबे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फक्त 100 टक्के शिक्षकांचे
लसीकरण झाले पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. लसीकरण न झाल्यास आम्ही
अांदोलनावर ठाम आहोत. गेल्या तीन महिन्यांपासून अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक
परिषद विविध माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या लसीकरणाबाबत
मागणी करत होती. परंतु प्रशासकीय पातळीवरुन कोणत्याही प्रकारच्या हालचाली
होत नव्हत्या. परंतु आज त्यादृष्टीने सकारात्मक पाऊल पडले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी याबाबत लवकरच लिखीत आदेश काढणार आहेत.
या निर्णयाबद्दल अहमदनगर जिल्हा शिक्षक
परिषदेने राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर राज्याध्यक्ष
राजेश सुर्वे यांचे आभार मानले आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र
क्षीरसागर तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जग्गनाथ भोर यांनी प्राथमिक शिक्षकांचे लसीकरणाबाबत सकारात्मकता दाखविल्याबदल शिक्षक
परिषद आभारी आहे. परंतु सर्व तालुक्यांमध्ये नव्याने गृहभेटी करण्याचे आदेश
तहसील कार्यालयाकडून बजावले जात आहे. त्या आगोदर जिल्ह्यातील सर्व
प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण होणे अपेक्षीत आहे, असे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी म्हटले आहे.
Post a Comment