वृक्षाराेपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज... सरपंच चित्राताई वराळ यांचे प्रतिपादन ​


​पारनेर ः
निघोज व परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याची सर्वाधिक गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती निघोजच्या कार्यसम्राट सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील यांनी दिली.
 
संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरमधील कोरोना रुण्ग बरे झाल्यानंतर त्यांना केशरी आंब्याचे रोप देऊन त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. ज्यांनी कोव्हिड सेंटरला देणग्या दिल्या आहेत. त्यांचाही सन्मान तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा हाच उपक्रम राबवण्यात येतो.
 
गेली पंधरा दिवसांपासून 500 पेक्षा जास्त मान्यवरांना केशरी आंब्याचे रोप देउन त्यांचा सन्मान करण्यात आला.पावसाळ्याचे दिवस आहेत. यावर्षी चांगला पाऊस होणार आहे. याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यासाठी निघोज परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी निघोज ग्रामपंचात व ग्रामस्थ प्रयत्नशील आहे. 

पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील कचरदास उनवणे यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला पाच हजार 555 रुपयांची देणगी दिली. तसेच शेकडो मान्यवरांनी देणग्या दिल्या.
 
यानिमित्ताने  देणगीदार व बरे झालेले कोरोना रुण्गांचा केशरी आंब्याचे रोप देऊन संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनने सत्कार केला आहे. पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे व त्यांची नात स्वराजंली रोहन उनवणे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे पुतणे जळगाव जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील कचरदास उनवणे यांनी 5 हजार 555 रूपयांची देणगी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला दिली. म्हणून त्यांचा सत्कार गावचे प्रथम नागरिक सरपंच म्हणून माझ्या हस्ते करण्यात आला.
 
पत्रकार उनवणे यांनी केशरी आंब्याचे रोप घराजवळील शेताच्या बांधावर लावले अशा प्रकारे ज्यांचा केशरी आंब्याचे रोप देउन सन्मान करण्यात आला. त्यांनी सुद्धा अशाप्रकारे वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धन करण्यात यावे, असे आवाहन सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post