श्रीगोंदा : भाजपा सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकविण्यासाठी आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केली.
ओबीची आरक्षणासंदर्भात भाजपने चक्का जाम आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार बबनराव पाचपुते यांनी आघाडी सरकारवर टीका केली.
यावेळी भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष रायकर, भजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, शहाजी हिरवे, डॉ. अशोक वाकडे, ज्येष्ठ नेते पोपट खेतमाळीस, नगरसेवक बापूसाहेब गोरे, अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस, आढळगावचे माजी सरपंच देवराव वाकडे, बळीराम बोडखेसतिश काळे, महिला अध्यक्षा सुवासिनी गांधी, तनुजा गायकवाड, डॉ.स्मिता तरटे, सुनिता वाकडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
पाचपुते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण या मुद्यावर वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. या सरकारने आरक्षणासंदर्भात आता ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. सरकारच्या चुकीचा नहाक इतरांना फटका बसत आहे, असे पाचपुते म्हणाले.
Post a Comment