पारनेर : जिल्हा वार्षीक योजना सन २०२०-२१ अंतर्गत ५०/५४ शिर्षकाखाली पारनेर-नगर मतदारसंघातील रस्त्यांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
आमदार नीलेश लंके म्हणाले, कोरोना महामारीमुळे विकास कामांना काहीसा ब्रेक लागला होता. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने विविध विकास कामांच्या यापूर्वी दिलेल्या प्रस्तावांना उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राधान्याने मंजुरी दिली आहे.
मतदारसंघातील प्रत्येक गावांतील विकास कामे मार्गी लावण्याचे आपले नियोजन असून कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. प्रमुख गावांबरोबरच लहान गावे वाडया वस्त्यांवरही विकासाची गंगा पोहचली पाहिजे हे आपले ध्येय आहे.
विकास कामांमध्ये राजकाणाचा अडसर कदापीही येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. आदिवासी बांधवांसाठीही विविध योजना राबविण्यात येणार आहे. त्यांचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर सादर करण्यात आले आहेत. लवकरच या योजनांचा निधी मंजूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध गावांना मंजूर झालेेला निधी पुढीप्रमाणे
दैठणेगुंजाळ ते पिंपळगांव कौडा इजिमा २८६ रस्ता सुधारणा करण्यासाठी ५० लाख, पुणेवाडी ते रा. मा. ६७ कान्हूर पारनेर इजिमा २२७ रस्ता सुधारणा करण्यासाठी ५० लाख, हत्तलखिंडी रा. मा. ६७ पारनेर कान्हूर रोड ते इजिमा २८८ रस्ता सुधार करण्यासाठी ५० लाख, वनकुटे ते पठारवाडी इजिमा २६० रस्ता सुधार करण्यासाठी ५० लाख, हंगा शहंजापूर सुपा प्रजिमा १९४ रस्ता सुधारणा करण्यासाठी एक कोटी, खारे कर्जुने हिंगणगांव, निमगांववाघा केडगांव प्रजिमा १७० रस्ता सुधारण करण्यासाठी एक कोटी.
Post a Comment