पारनेरमध्ये चिंता कायमच...


नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी व जास्त होत आहे. शनिवारी बाधितांचा आकडा कमी झालेला आहे. शुक्रवारी आकडा वाढला होता. 

जिल्ह्यात आज शनिवारी 353 बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 33, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 133,  तर अँटीजेन चाचणीत 187 असे एकूण 353 कोरोना बाधित आढळून आले. 

पारनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. पारनेरमध्ये 51 जण बाधित आढळून आलेले आहेत. पारनेर तालुक्याने गेल्या तीन दिवसांपासून बाधितांच्या आकड्यात घेतलेली आघाडी असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करणे तालुक्यात गरजेचे बनले आहे.

जिल्ह्यात दुसर्या क्रमांकाची आकडेवारी श्रीगोंद्यात आढळून आलेली आहे. श्रीगोंद्यातमध्ये 46 तर पाथर्डीत 28 जण सापडलेले आहेत. 

नगर शहरात अवघे अकरा बाधित आढळले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी शहरात तीन रुग्णांची वाढ झालेली आहे. 

गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी रुग्णांची संख्या वाढली आहे. आज शनिवारी हा आकडा कमी झालेला आहे.

बाधितांचा आकडा कमी जास्त होत आहे. त्यांमुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तिसर्या लाटेची शक्यता असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील बाधितांचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यात काही अंशी यश आलेले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post