कर्जत : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ कर्जत भाजपाच्यावतीने कर्जत येथे चक्काजाम व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असून सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा भाजपा निषेध व्यक्त करीत आहे. या आशयाचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, जेष्ठ नेते शांतीलाल कोपनर, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, किसान मोर्चाचे सुनील यादव,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य सरकारने ओबीसी आरक्षण रद्द करीत आपल्यावर अन्याय केला असून ओबीसी आरक्षण कायम करावे, या मागणीसाठी कर्जत भाजपाच्यावतीने शनिवारी ११ वाजता अहमदनगर- बारामती महामार्गावर काही काळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुनील गावडे, जेष्ठ नेते शांतीलाल कोपनर, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, डॉ कांचन खेत्रे, विनोद दळवी, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
राज्यातील महाविकास आघाडीवर चौफेर टीका करत न्याय मिळावा, अशी मागणी केली.यावेळी आंदोलनकर्त्यांनी वरील आशयाचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिले. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी आभार मानले.
"ओबीसी के सन्मान मे, भाजपा मैदान मे" कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरपंच काकासाहेब धांडे, अनिल गदादे, अमृत काळदाते, ज्ञानदेव लष्कर, पप्पू धोदाड, गणेश पालवे, नगरसेविका उषा राऊत, राणी गदादे, मंदा होले, आशा वाघ,प्रतिमा रेणूकर, आरती थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या चक्काजाम आंदोलनाने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी ती तात्काळ सुरळीत करण्यात यश मिळवले.
भाजपाच्या काही प्रमुख नेत्यांनी फिरविली पाठ
मंत्री असताना राम शिंदे यांच्यासोबत असणारे कर्जत भाजपाचे प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात उपस्थित नसल्याने उपस्थितांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती. यात भाजपाची सत्ता असताना जे भाजपाचे प्रमुख माजीमंत्री राम शिंदे यांचे काही निकटवर्तीय होते. त्यांच्यासह नगर पंचायतीचे काही पदाधिकारीही या आंदोलनात दिसले नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीमुळे उपस्थितांमध्ये चर्चा होती.
Post a Comment