पारनेरमध्ये पाच दिवसात 338 रुग्ण...


पारनेर : पारनेर तालुक्यात रुग्णांची संख्या सर्वाधिक दिसून येत आहे. मागील पाच दिवसात 338 रुग्ण आढळून आलेले आहे. रुग्ण संख्या कमी व्हावी, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. काही अंशी यश येत असले तरी बेफिकीरांमुळे त्यावर पाणी फेरले जात आहे.

पारनेर तालुक्यात 23 ते 27 जून या पाच दिवसात तब्बल 338 रुग्ण आढळून आलेले आहे. विशेष म्हणजे काही दिवस जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पारनेर तालुक्यात आढळले आहेत.

या पाच दिवसात 23 जूनला सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. 23 जूनला पारनेरात 90 रुग्ण आढळून आले होते. 24 जूनला 89 रुग्ण आढळून आले आहेत.

24 जूननंतर पारनेरात रुग्णांची संख्या घटली आहे. परंतु तालुक्यातील ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यात पारनेर तालुक्यात सर्वाधिक आहे. 

सध्या पारनेरमध्ये बाधितांचा आकडा 55च्या आत आला असला तरी तो शून्य करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु प्रशासनाच्या प्रयत्नांवर काही बेफिकीरांकडून पाणी फेरले जात आहे.

तालुक्यातील जवळा, निघोज, कुरुंद, पठारवाडी आदी भागात बाधित आझळून येत आहेत. या भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी होत नसल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. या भागात प्रशासनाने कडक उपाययोजना या भागात कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post